Ileana D’Cruz Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D’Cruz) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. इलियाना ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. इलियाना तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. इलियानानं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

Continues below advertisement


इलियानाने मंगळवारी (18 एप्रिल) सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. इलियानाने दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये  एका छोट्या मुलाच्या ड्रेस दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये 'मामा' हे पेंडेंट दिसत आहे. हे फोटो शेअर करुन  त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कमिंग सून,माझ्या लहान डार्लिंगला भेटण्याची मी वाट बघत आहेत.' इलियानाच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे.  


 नेटकऱ्यांच्या कमेंट्स


इलियानाच्या प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. इलियानानं शेअर केलेल्या पोस्टला एका युझरनं कमेंट केली, 'होणाऱ्या बाळाचे वडील कोण आहेत?' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तुझं लग्न झालं आहे का?' अनेकांनी इलियानाच्या या पोस्टला लाइक केलं आहे.






कतरिना कैफच्या भावाला इलियाना करतीये डेट?


इलियाना डिक्रूज काही वर्षांपूर्वी अँड्रयू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अभिनेत्रीने एकदा इन्स्टाग्राम पोस्टमध्ये  अँड्रयूचा "बेस्ड हबी" असा उल्लेख केला होता. पण दोघांनी त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. 2019 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते.   इलियाना ही कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. कॉफी विथ करण सीझन 7 च्या एका एपिसोडमध्ये करण जोहरनेही त्यांच्या नात्याची  चर्चा केली होती. 


 इलियानाचे चित्रपट


बर्फी,फटा पोस्टर निकला हिरो, मैं तेरा हीरो, रूस्तुम, हॅप्पी एंडिंग,रेड यांसारख्या चित्रपटांमध्ये इलियानानं काम केलं आहे. तसेच तिनं  तेलुगू  आणि  तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Ileana Dcruz Bikini Look : मालदिवमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड लूक