Saif Ali Khan Attack CCTV Video : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरलेल्या चोराने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यावेळी चोर घरात शिरतानाचा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा मुंबई पोलिस आणि क्राईम ब्राँचकडून कसून तपास सुरु असताना पोलिसांच्या हाती आता आणखी एक पुरावा लागला आहे. आरोपी इमारतीत शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.


आरोपीचा नवा सीसीटीव्ही समोर


अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चोराने प्राणघातक हल्ला केला. यानंतर चोर घरात शिरला कसा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. घटनेनंतर चोर पळ काढताना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला होता. मात्र, तो आतमध्ये कसा आला याचा तपास सुरु होता. आता अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून तो पायऱ्या चढतानाच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं आहे.  


दबक्या पावलांनी आणि तोंड बांधून आला चोर


आरोपी दबक्या पावलांनी इमारतीत शिरतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता पोलिसांच्या हाती लागला आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये आरोपी तोंड बांधून दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यावरून वरती येताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर काळा रंगाचे टीशर्ट-पँट आणि बॅग घेऊन लपत-छपत पायऱ्या चढताना दिसत आहे.


दबक्या पावलांनी सैफच्या घरात घुसला चोर



अडीच इंचाचा चाकूचा तुकडा सैफचा पाठीत


यासोबतच सैफ अली खानच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा हादरवणारा फोटो समोर आला आहे. चोराने सैफ अली खानवर सपासप वार केले होते. सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार झाले होते. हल्लेखोराने सैफच्या पाठीत चाकू खुपसला, तेव्हा त्याचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता. डॉक्टरांनी अडीच इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करुन काढला. आता सैफची प्रकृती स्थिर आहे.


सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा फोटो



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Saif Ali Khan Attack : सैफ अली खानची हिंमत वाघासारखी, रक्तबंबाळ अवस्थेत स्वत: रुग्णालयात पोहोचला; डॉक्टरांनी काय-काय सांगितलं?