Saif Ali Khan Knife Attack : अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत सैफच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली आहे. चोराच्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ रक्तबंबाळ अवस्थेत स्वत: चालत रुग्णालयात पोहोचला. त्याच्या या हिंमतीचं डॉक्टरांनी कौतुक केलं.


रक्तबंबाळ अवस्थेत स्वत: चालत रुग्णालयात पोहोचला सैफ


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार की, रक्तबंबाळ सैफ अली खान एका वाघासारखा रूग्णालयात दाखल झाला होता. त्याच्यासोबत त्याचा लहान मुलगा तैमूरही होता. सैफच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे. सैफ आता चालू लागला आहे. आयसीयूतून त्याला स्वतंत्र रूममध्ये शिफ्ट केलंय. सैफ अली खान यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.


डॉक्टरांनी काय-काय सांगितलं?


गुरुवारी पहाटे सैफवर शस्त्रक्रिया पार पडली, त्यांना शस्त्रक्रियेनंतर त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. शुक्रवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. पाठीमध्ये खोल जखम असल्याने त्याला बेडरेस्टची गरज आहे. त्याच्या पाठीत पाणी झालं होतं, त्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्याला आराम करण्याची गरज आहे. आज त्याला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येईल. 


पाहा व्हिडीओ : डॉक्टरांची पत्रकार परिषद



महत्त्वाच्या इतर बातम्या :


सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत मोठी अपडेट, वांद्रे स्थानकाच्या सीसीटीव्हीत कैद; हल्लेखोर ‘या’ दिशेने पळाल्याचा संशय