Sachin Kharat : राज ठाकरेंसंबंधित (Raj Thackeray) प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) पोस्ट सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी (Sachin Kharat) राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सचिन खरात यांनी म्हटले आहे, राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणाचे समर्थन केल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची पोस्ट तपासून राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातूनदेखील त्यांना काढण्यात यावे.
सचिन खरात यांनी पुढे म्हटले आहे, राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये चिथावणीखोर भाषण केले. तरीदेखील प्राजक्ता माळी यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं समर्थन केलं आहे. प्राजक्ता माळी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षण घेतलं व आज लोकप्रिय कलाकार झाला आहात."
प्राजक्ता माळीने याआधी शिवाजी पार्क येथे झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातदेखील हजेरी लावली होती. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत हटके कॅप्शनदेखील लिहिले होते.
प्राजक्ताने पोस्ट लिहिल्यानंतर लगेचच एडिट केली आहे. पण तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मात्र चांगलीच व्हायरल होत आहे. प्राजक्ताने राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणारी पोस्ट लिहिली होती. पण काही वेळातच तिने ही पोस्ट एडिट केली.
संबंधित बातम्या