Rudra: The Edge Of Darkness : अजय देवगणची (Ajay Devgn) 'रुद्रा' (Rudra) ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'रुद्रा' वेबसीरिजमधील अजय देवगणचा किलर लूक प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.  4 मार्चला ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. 


'रुद्रा' या वेबसीरिजची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. आता ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  या सीरिजमध्ये अजय देवगणने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. 'रूद्रा' ही वेबसीरिज 6 भागांची असून रुद्रवीर सिंह हे पात्र अजय देवगण साकारत आहे. ईशा देओल, राशी खन्ना, अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर, मिलिंद गुणाजी आणि ल्यूक केनीदेखील या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.





राजेश मापुसकर यांनी 'रुद्रा' या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंटने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून अजय देवगणने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. 'रूद्रा'मध्ये अजय देवगणने एसीपी रुद्रवीर सिंगची भूमिका साकारली आहे. 


संबंधित बातम्या


Jhund : ‘नागराज ऑस्कर आणेल याची खात्री!’, ‘झुंड’ पाहून भारावलेल्या वैभव मांगलेंची पोस्ट


90s Actress On OTT : माधुरी दीक्षितपासून सुष्मिता सेनपर्यंत, 'या' 90 च्या दशकातील अभिनेत्रींचा ओटीटीवर जलवा


Netflix Trivia Quest : नेटफ्लिक्स लाँच करणार ‘डेली क्विझ शो’, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला! 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha