90s Actress On OTT : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) नुकतेच 'द फेम गेम' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. सुष्मिता सेन, रवीना टंडन, करिश्मा कपूर, तब्बूसारख्या 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी ओटीटीवर पदार्पण केले आहे.
माधुरी दीक्षित - द फेम गेममाधुरी दीक्षितने नेटफ्लिक्सच्या 'द फेम गेम' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 90 च्या दशकात रुपेरी पडदा गाजवणाऱ्या माधुरीने आपल्या अभिनयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील आपला दबदबा कायम ठेवला आहे. सुष्मिता सेन - आर्यासुष्मिता सेनने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1996 साली प्रदर्शित झालेल्या 'दस्तक' सिनेमाच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच तिच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरदेखील धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर सुष्मिताने 2019 साली हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या 'आर्या' वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले.
रवीना टंडन - आरण्यकगेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'आरण्यक' या वेबसीरिजमध्ये रवीना टंडन एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून आली होती. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
करिश्मा कपूर - मेंटलहुड2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेंटलहुड' या वेबसीरिजच्या माध्यमातून करिश्मा कपूरने कमबॅक केले होते. या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तब्बू - अ सूटेबल बॉय'अ सूटेबल बॉय' ही वेबसीरिज 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. या वेबसीरिजमध्ये तब्बूने सईदाबाईची भूमिका साकारली होती. या वेबसीरिजदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.
संबंधित बातम्या
Netflix Trivia Quest : नेटफ्लिक्स लाँच करणार ‘डेली क्विझ शो’, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Tiger 3 teaser : कतरिना अन् सलमानच्या 'टायगर-3' चा धमाकेदार टीझर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
Satrangi Song Out : 'आश्रय' चित्रपटातील 'सतरंगी...' होळीगीत वाढवणार संगीतप्रेमींचा उत्साह!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha