Netflix Trivia Quest : नेटफ्लिक्स (Netflix) हा ओटीटी प्लॅटफॉर्म 1 एप्रिलपासून आपला पहिला संवादात्मक दैनिक क्विझ शो ‘ट्रिव्हिया क्वेस्ट’ (Trivia Quest) लाँच करणार आहे. Engadgetच्या माहितीनुसार ‘ट्रिव्हिया क्वेस्ट’ या क्विझ सिरीजमध्ये कला आणि विज्ञान यासारख्या विषयांमधील 24 बहु-निवडक प्रश्न असतील.


या खेळात अर्थात ‘ट्रिव्हिया क्वेस्ट’मध्ये कोणताही रिअल-वर्ल्ड रिवॉर्ड ऑफर केला जाणार नाही. परंतु, नेटफ्लिक्स वापरकर्ते या खेळात अधिक गुण मिळविण्यासाठी आणि विशिष्ट समाप्तीकडे पुढे जाण्यासाठी यातील एखादा एपिसोड पुन्हा प्ले करू शकतील. म्हणजेच या खेळात मोठी बक्षीसं मिळणार नसली, तरी खेळ पूर्ण करण्यासाठी किंवा हे गुण वाध्व्ण्यसाठी पुन्हा एकदा मागे जाण्याची संधी मिळणार आहे.


नेटफ्लिक्सचा नवा प्रयोग!


अपडेटेड ब्राउझर, मोबाईल डिव्हाईसेस, स्मार्ट टीव्ही आणि स्ट्रीमिंग हार्डवेअरसह इंटरॅक्टिव्ह नेटफ्लिक्स कंटेंटला सपोर्ट करणाऱ्या सर्व उपकरणांवर हा क्विझ शो खेळता येणार आहे. या अहवालात असे म्हटले गेले आहे की, नेटफ्लिक्स कंपनी ‘ट्रिव्हिया क्वेस्ट’ला एक प्रयोग म्हणून लोकांपर्यंत पोहचवण्यास उत्सुक आहे आणि यासारख्या आणखी एखाद्या शोचा या प्लॅटफॉर्मवर विचार केला गेलेला नाही. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यास भविष्यात असेच अनेक महत्त्वाकांक्षी इंटरॅक्टिव्ह शो नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येऊ शकतो.


Netflix कंपनी अनेकदा त्यांच्या सेवेत नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने त्यांचे भारतातील सबस्क्रिप्शन दर कमी केले होते. मग, त्यांनी आणखी एक नवीन फीचर देखील आणले. या फिचरनुसार वापरकर्ते आता 'Continue Watching' सूचीमधून एखादा कंटेंट हटवू देखील शकतात.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha