SS Rajamouli : सिने-दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) सध्या त्यांच्या बहुचर्चित 'आरआरआर' (RRR) या सिनेमामुळे चर्चेत आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारानंतर (Golden Globe Awards) त्यांनी आता अमेरिकन सिने-दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग (Steven Spielberg) यांची भेट घेतली आहे. 


एसएस राजामौलींनी (SS Rajamouli) सोशल मीडियावर स्टीवन स्पीलबर्ग Steven Spielberg) यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"देवाची भेट झाली". एसएस राजामौली यांनी स्टीव्हन स्पीलबर्ग यांना देवाचा दर्जा दिला आहे. यावरूनच ते या भेटीमुळे किती आनंदी झाले आहेत याचा अंदाज येतो. 


एसएस राजामौली यांनी स्पीलबर्गसोबतच्या त्यांच्या भेटीचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत स्पीलबर्गला भेटल्यानंतर राजामौलींचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत संवाद साधताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत एसएस राजामौली आणि स्पीलबर्ग यांच्यासोबत एमएम कीरावानी देखील आहेत.  






एसएस राजामौली आणि स्पीलबर्ग यांची भेट नक्की कुठे आणि कधी झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. राजामौली नुकत्याच झालेल्या 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात स्पीलबर्गला भेटले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


राजामौली यांच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं आहे,'सिनेप्रेमीची सिनेप्रेमीला भेट', 'तुम्ही दोघेही दिग्गज आहात','तुम्ही दोघांनी आजवर चांगले सिनेमे दिले आहेत, आम्हाला तुमचा अभिमान आहे सर". 


गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील (Golden Globe Awards 2023) बेस्ट ओरिजिनल साँग हा पुरस्कार 'आरआरआर' (RRR) मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे.


संबंधित बातम्या


Golden Globe Awards 2023: 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा संपन्न; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी