Celebs Wishes Makar Sankranti : मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. शिल्पा शेट्टीपासून (Shilpa Shetty) अर्जुन कपूरपर्यंत (Arjun Kapoor) अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 



अर्जुन कपूरने एक चांगलं कलात्मक पोस्टर इंस्टा स्टोरीवर ठेवलं आहे. या पोस्टरवर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा असं लिहिण्यात आलं आहे. 



शिल्पा शेट्टी आणि अर्जुन कपूरसह बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची लेक आणि अभिनेत्री अनन्या पांडेनेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील मायराने मकरसंक्रांत स्पेशल लूक करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं आहे,"दु:ख असावे तीळा सारखे आनंद असावा गुळासारखा, तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे भोगी व मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा". 






मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधरने काळ्या रंगाची साडी नेसून एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"सुख कळले".




संबंधित बातम्या


Akshaya Deodhar Makar Sankranti Special : काळी साडी, नाकात नथ, मंगळसूत्र, केसात गजरा; पाठकबाईंचा मकरसंक्रांत स्पेशल लूक पाहिलात का?