Oscar Awards 2023 : सध्या जगभरात 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्यानं गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला तर आता या चित्रपटाने ऑस्कर (Oscar 2023) हा पुरस्कार जिंकला आहे. नाटू नाटू गाण्याचे संगीतकार कोण आहेत? हे गाणं कोणी लिहिलं? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. जाणून घेऊयात नाटू नाटू या गाण्याबाबत...
चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे. तर एम एम किरावाणी यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नाटू नाटू या गाण्यातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रेम रक्षित यानं या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. या गाण्यातील सिग्नेचर स्टेप ही आयकॉनिक ठरली.
एस. एस राजामौली, किरावाणी आणि चंद्रबोस यांनी 17 जानेवारी 2020 पासून या गाण्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत चंद्रबोस यांनी गाण्याचा काही भाग लिहिला आणि मग किरावाणी यांची भेट घेतली. किरावाणी यांना गाणं खूप आवडलं. गाण्याचे 90 टक्के काम दोन दिवसांत पूर्ण झाले, पण संपूर्ण गाणं तयार होण्यासाठी 19 महिने लागले, असं म्हटलं जातं.
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
युक्रेनमध्ये झाले गाण्याचे शूटिंग
नाटू-नाटू या गाण्याचे शूटिंग युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. याबद्दल दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. तसेच आरआरआर चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते.
जाणून घ्या संगीतकार एम एम किरावाणी यांच्याबद्दल...
1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मनासु ममता' या तेलुगू चित्रपटामधून करिअरला सुरुवात केली. जख्म' चित्रपटातील 'गली में आज चांद निकला' या गाण्यामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. एमएम करिम या नावाने ते चित्रपटसृष्टीत ओळखले जातात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Oscar Awards 2023: भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी मुसंडी; RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर अवॉर्ड