Milind Gawali : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता अभिनेत्याने सोशल मीडियावर गोशाळेतील एक व्हिडीओ शेअर करत तेथील सुखद अनुभवावर भाष्य केलं आहे.
मिलिंद गवळींची पोस्ट काय आहे? (Milind Gawali Post)
मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे,"हंबरुन वासराले चाटती जवा गाय, तिच्यांमध्ये दिसती मले तवा माझी माय". काही दिवसांपूर्वी रावेत पुण्याचे रविशंकर सहस्त्रबुद्धे यांच्या गोशाळेत जाण्याचा योग आला. ते भारतातील प्रख्यात गीर गाईंच्या जातीचे संशोधक, अभ्यासक आहेतच आणि त्यांच्या गोशाळेमध्ये शंभरहून अधिक गीर जातीच्या गायी आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्याकडे त्या गाईंची निगा ठेवली जाते. ते सगळं पाहून मन भारावून गेलं आणि भरुनही आलं".
मिलिंग गवळी यांनी पुढे लिहिलं आहे,"श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं आणि माझ्या नावातच गवळी आहे, त्यामुळे गाईंच्या सानिध्यात राहणं माझा अधिकारच आहे, कदाचीत म्हणूनच गाईंच्या सानिध्यात माझं मन रमतं आणि रविशंकर यांसारख्ये व्यक्ती ज्यांना गाईंविषयी एवढं ज्ञान आहे आणि खूप छान पद्धतीने ते गाईंची काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलचं माझं प्रेम आणि आदर खूप खूप वाढला आहे. त्यांची गोशाळा बघून त्यांचं ज्ञान जाणवून त्यांच्याबद्दल मला खूप हेवा वाटला. आपण गवळी असून आपल्याला या जन्मात असं काही जमणार नाही याचीही खंत वाटली".
गायीबद्दल बोलताना मिलिंद गवळी म्हणाले,"आजच्या काळामध्ये शहरात राहणाऱ्या लाल गाईला घरी आणणं ही तर अशक्य गोष्ट वाटते. पूर्वीच्या काळी गावात, प्रत्येक घरात एक गाय असायचीच, असं म्हटलं जायचं. ज्याच्या घरी गाय आहे, त्याच्या घरी मुलं बाळ दुष्काळात पण उपाशी राहणार नाहीत. आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. गाईची पूजा केली जाते. कितीतरी वेळेला माझ्या आईने मला गाईसाठी काढून ठेवलेला नैवेद्य गाईला भरवून ये असं सांगायची आणि मी गाय शोधत अनेकदा फिरलो आहे. पण आता रविशंकरांबरोबर चर्चा करत असताना लक्षात आलं की आपल्या देशात अनेक ठिकाणी अजूनही गायांची फार काळजी घेतली जात नाही".
मिलिंद गवळी यांनी पुण्याच्या रविशंकर सहस्त्रबुद्धे यांच्या गोशाळेला भेट दिली आहे. या गोशाळेतील सुखद अनुभवावर त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या