Ram Charan Special Gift for Alia Bhatt's Daughter : साऊथ सुपरस्टार रामचरण आणि अभिनेत्री आलिया भट यांनी ब्लॉकबस्टर आरआरआर चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या दोघांची चांगली मैत्री आहे. काम आणि व्यस्त शेड्युलमुळे दोघेही एकमेकांना फारसे भेटत नाहीत. पण, त्यामुळे त्यांच्या मैत्रीवर काही फरक पडत नाही. अलिकडे आलियाने सांगितलं की, तिच्या लेकीसाठी रामचरणने खास भेटवस्तू दिली आहे. अभिनेता रामचरणने आलिया भटची लेक राहासाठी हत्ती भेट दिला आहे. याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
रामचरण आणि आलिया भटची मैत्री
एस एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटात काम केल्यापासून आलिया आणि रामचरण यांच्यात घट्ट मैत्री झाली आहे. दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या दोघांचा ऑफ स्क्रिन बॉन्डदेखील खूप खास आहे. आलिया भटने अलिकडेच एका मुलाखतीत रामचरण बद्दलचा किस्सा सांगितला आहे, जे ऐकताच सर्वजण अवाक झाले आहे. यावरुनच तुम्हाला कळेल की, रामचरण फक्त सुपरस्टार नसून त्या नावाला साजेसं असं त्याचं व्यक्तिमत्वही आहे.
साऊथ सुपरस्टारकडून आलिया भटच्या लेकीसाठी खास गिफ्ट
आलिया भटने एका मुलाखतीत सांगितलं की, "हा खूप मजेदार किस्सा आहे. राहाच्या जन्माच्या एकानंतर महिन्यानंतर मी बिल्डिंगच्या खाली उतरली होती. तेवढ्यात मला कुणीतरी येऊन सांगितलं, रामचरण सरांनी हत्ती पाठवला आहे. हे ऐकून मी हैराण झाली. मी रामचरणला ओळखत असल्यामुळे मला वाटलं की, काहीही होऊ शकतं आणि माझ्या बिल्डिंगमध्ये एक विशालकाय हत्ती फिरत असेल".
राहाला हत्ती भेट दिला
आलियाने पुढे सांगितलं की, "रामचरणने एक लाकडाचा हत्ती राहासाठी भेट म्हणून पाठवला होता. रामचरणने राहाच्या नावाने जंगलातील एक हत्तीचं पिल्लू दत्तक घेतलं होतं. त्यानंतर त्याने राहासाठी लाकडी हत्ती भेट म्हणून पाठवला होता. त्या लाकडी हत्तीचं नाव एली ठेवल्याचंही तिने सांगितलं. यावेळी आलियाने रामचरणचं तोंड भरुन कौतुक केलं. आलिया पुढे म्हणाली की, "हत्तीला आम्ही आमच्या घरात पाचव्या मजल्यावर ठेवलं आहे आणि राहा त्याच्यावर बसते, त्याच्यासोबत खेळते".
रामचरणने राहाच्या नावाने दत्तक घेतला हत्ती
आलिया भटचा जिगरा हा चित्रपट 11 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये आलिया भटसोबत वैदांग रेना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत आलियाने रामचरणबाबत हा खुलासा गेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :