Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Box Office Collection Day 3: करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.या चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.  'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटानं रविवारी (30 जुलै) म्हणजेच रिलीजच्या तिसर्‍या दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात...


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे.या चित्रपटानं पहिल्या दिवशी 11.10 कोटींचे कलेक्शन केले आहे. वीकेंडला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. शनिवारी चित्रपटाच्या कमाईत 44.59 टक्क्यांनी वाढ झाली. शनिवारी या चित्रपटानं  16.5 कोटी रुपये कमावले. 


सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटानं रिलीजच्‍या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी 18 कोटी रुपयांचे  कलेक्‍शन केले आहे. त्यानंतर चित्रपटाची तीन दिवसांची एकूण कमाई आता 45.15 कोटींवर गेली आहे.






'रॉकी और रानी की प्रेम कहानी'. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच  सारा अली खान आणि  अनन्या पांडे यांच्या देखील या चित्रपटात छोट्या भूमिका आहेत.'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात  रंधावा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात रॉकी आणि रानी या कपलची कथा मांडण्यात आली आहे. 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधून करण जोहरने सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचं कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'... मनोरंजनाचे उत्तम पॅकेज