Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आऊट झाला आहे. 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer) या सिनेमाच्या माध्यमातून करण जोहर (Karan Johar) एक नवी कोरी प्रेम कहानी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना पुन्हा एकदा करण जोहरची हटके स्टाइल पाहायला मिळणार आहे. आलिया आणि रणवीरचा रोमान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 






'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करण जोहरने या सिनेमाचा ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे,"प्रेमाची शक्ती आणि प्रेमाला साथ देणारं कुटुंब... दोन्ही अपराजित... रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची झलक नक्की पाहा. 28 जुलैला सिनेमागृहात होणार प्रदर्शित".


'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या ट्रेलरमध्ये आलिया आणि रणवीरची लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. कौटुंबिक नाट्य असणाऱ्या या सिनेमाचं कथानक खूपच मनोरंजक आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. आता येत्या 28 जुलैला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


तगडी स्टारकास्ट असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या माध्यमातून करण जोहर सात वर्षांनी कमबॅक करत आहे. या सिनेमात आलिया-रणवीरसह शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चनदेखील झळकणार आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.


बंगाली मुलगी आणि पंजाबच्या मुलाची हटके लवस्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रणवीरने या सिनेमात रॉकी रंधावाची भूमिका साकारलीआहे. तर आलिया रानीच्या भूमिकेत दिसत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचं कथानक इथिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलं आहे. 


संबंधित बातम्या


Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया भट्ट आणि रणवीर सिंहचा रोमँटिक अंदाज; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातील 'तुम क्या मिले' गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मने