Tejasswi Prakash Karan Kundra Wedding Update : तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय जोडी आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. करण आणि तेजस्वीची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 


तेजस्वीने आता नुकत्याच एका मुलाखतीत लग्नबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणाली,"मी आणि करण लग्न कधी करणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण मी लग्नासाठी तयार आहे असं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी नक्कीच लग्न करण्याचा निर्णय घेईल.आम्हा दोघांची काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा सध्या आमचा प्रयत्न आहे. आमच्यावर कोणाचाही दबाव नसल्याने मी जेव्हा लग्नासाठी तयार असेन तेव्हा तो माझ्यासोबत लग्न करेन". 


तेजस्वी पुढे म्हणाली,"गेल्या काही दिवसांपूर्वी मी एक घर खरेदी केलं होतं. पण करण आणि तेजस्वीने मिळून घर घेतल्याची चर्चा रंगली. या चर्चा करणाऱ्यांना मला सांगावसं वाटतं की, मी कोण आहे? किती दिवसांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे याची तुम्हाला कल्पना आहे का?". 






करण आणि तेजस्वी दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्यांना 'तेजरन' म्हणून हाक मारतात. 'बारिश आई है' या म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून करण आणि तेजस्वी नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असून चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.


तेजस्वी आणि करणची लव्हस्टोरी (Tejasswi Prakash Karan Kundra Love Story)


सलमान खानच्या 'बिग बॉस 15'मध्ये (Bigg Boss 16) तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या प्रवासादरम्यान तेजस्वी आणि करणची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. बिग बॉसनंतर तेजस्वी एकता कपूरच्या'नागिन 6' या मालिकेत झळकली. तर करणने छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रम होस्ट केले. करण आणि तेजस्वी दोघेही सध्या कामात वयस्त आहेत. 


संबंधित बातम्या


Tejasswi Prakash : ‘लग्न कधी करणार?’ प्रश्नावर वैतागलेल्या तेजस्वी प्रकाशने दिलं हटके उत्तर! व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत