Rocky Aur Rani Ki Prem Kahani: अभिनेत्री आलिया भट्ट

  (Alia Bhatt)  आणि  अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील  तुम क्या मिले हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या गाण्यात आलिया आणि रणवीरचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. आता या चित्रपटामधील  व्हॉट झुमका (What Jumka)  हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यामधील आलिया आणि रणवीरचा जबरदस्त डान्स प्रेक्षकांना बघायला मिळाला. 


व्हॉट झुमका हे जबरदस्त पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं अरिजित सिंह आणि जोनिता गांधी यांनी गायलं आहे.या गाण्याचे गीतकार अमिताभ भट्टाचार्य हे आहेत. या गाण्यातील रणवीर आणि आलिया यांच्या जबरदस्त डान्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


धर्मा प्रोडक्शनच्या इन्साग्राम अकाऊंटवर व्हॉट झुमका हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. या गाण्याला कॅप्शन देण्यात आलं,'गिर जाये तो फिर ना कहना… झुमका गिरा रे' तसेच आलिया आणि रणवीर यांनी देखील त्यांच्या इन्साग्राम अकाऊंटवर व्हॉट झुमका हे गाणं शेअर केलं आहे.  व्हॉट झुमका या गाण्यात आलिया ही कलरफुल साडी आणि कानात झुमका अशा लूकमध्ये दिसत आहे. तर रणवीर हा डेनिमचे जॅकेट आणि जिन्स अशा कूल लूकमध्ये दिसत आहे.


पाहा गाणं:






'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात  रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. रणवीरनं या चित्रपटात रॉकी रंधवा ही भूमिका साकारली तर आलियानं या चित्रपटात रानी चॅटर्जी ही भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Tum Kya Mile Song: 'आलियाच्या रील एवढं बजेट नव्हतं'; रणवीरनं शेअर केला 'तुम क्या मिले' गाण्याचा खास व्हिडीओ