Samir Choughule Wife Kavita : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर समीर चौघुले (Samir Choughule) घराघरांत पोहोचला आहे. पण अभिनेत्याच्या पत्नीने लाईमलाईटपासून दूर राहणं पसंत केलं आहे. त्यांची पत्नी ही अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे. 


समीर चौघुलेची पत्नी कोण आहे? (Who Is Samir Choughule Wife)


समीर चौघुलेच्या पत्नीचं (Samir Choughule Wife) नाव कविता चौघुले (Kavita Choughule) आहे. समीर अनेकदा पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच पत्नीच्या वाढदिवसानिमित्त किंवा लग्नाच्या वाढदिवसाला तो खास पोस्टदेखील शेअर करत असतो. समीरची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या अभिनेत्रीलाही मागे टाकेल.


समीरची पत्नी कविताने संसार सांभाळल्यामुळे समीर त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू शकला आहे. आता लग्नाच्या 25 वर्षांनंतर समीर पैसे कमावत आहे. तर कविता घर सांभाळत आहेत. दोघेही एकमेकांना समजून घेत आहे. संसाराच्या सुरुवातीच्या काळात कविताने खूप मेहनत घेतली आहे. घर आणि नोकरी करत तिने संसाराचा गाढा ओढला आहे. आता मात्र ती गृहिणीच्या भूमिकेत आहे. 


समीर चौघुले आणि कविताची लव्हस्टोरी काय आहे? (Samir Choughule Kavita Choughule Love Story)


समीर चौघुले आणि कविताच्या लग्नाला आता 25 वर्ष झाली आहे. समीर आणि कविता कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. एका नाटकाच्या निमित्ताने समीर आणि कविताची भेट झाली होती. दरम्यान त्यांची छान मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 






काही दिवसांपूर्वी लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत समीर चौघुले म्हणाला होता,"माझ्या पडत्या काळात पत्नीने मला खूप धीर दिला आहे. तिच्या पाठिंब्यामुळे मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करतो आहे. कविताने नोकरी केली आणि स्वत:च्या गरजा कमी करुन माझ्या पाठिशी उभी राहिली. मला माझं करिअर तिने करुन दिलं आहे". समीर सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवण्याचं काम करत आहे.


संबंधित बातम्या


Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची टीम पोहोचली अमेरिकेला; समीर चौघुलेनं शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला, 'समाधान आणि आनंद'