एक्स्प्लोर
रितेश-जेनेलियाच्या बाळाचं बारसं, नाव ठेवलं...
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचं बारसं केलं आहे. राहिल (RAHYL) असं बाळाचं नामकरण केल्याची घोषणा रितेशने ट्विटरवर केली आहे.
रितेशने काळ्या बॅकग्राऊण्डवर गुलाबी अक्षरात राहिल असं लिहिलेला एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 'राहिल- देशमुख कुटुंबातील सर्वात लहानगा' असं कॅप्शन त्याने या इमेजला दिलं आहे. जेनेलियाने हा फोटो रिट्वीट करत राहिल रितेश देशमुख असं लिहिलं आहे.
https://twitter.com/Riteishd/status/741912696229003266
रितेश-जेनेलियाच्या दुसऱ्या बाळाचा जन्म 1 जून 2016 रोजी झाला होता. तर त्यांचा मोठा मुलगा रिआनचा जन्म 25 नोव्हेंबर 2014 रोजी झाला होता. रितेश आणि जेनेलिया यांचा विवाह 3 फेब्रुवारी 2012 रोजी झाला. 2003 मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर त्यांच्या अफेअरची सुरुवात झाली होती. के. विजया राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातून दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
सध्या रितेशचा बँजो हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
संबंधित बातम्या
रितेश देशमुखचं घर आनंदाने 'हाऊसफुल्ल', जेनेलियाला दुसरं बाळ
रितेश- जेनेलियाच्या बाळाचं बारसं, रितेशने बाळाचं नाव ठेवलं...
विलासरावांना नातवाचंही अभिवादन, जयंतीनिमित्त रितेशसह चिमुकला रिआनही नतमस्तक
जेनेलियासमोर पुन्हा लग्नाचा प्रस्ताव
रितेश- जेनेलियाचा 'लय भारी' पाहुणा घरी आला !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement