Riteish Deshmukh Genelia Dsouza Love Story : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसुझा (Genelia Dsouza) हे बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल आहे. दोघे इंडस्ट्रीतील आयडल कपल म्हणून ओळखले जातात. गेल्या 20 वर्षांपासून ते एकमेकांसोबत आहेत. 9 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. 'कपिल शर्मा शो'मध्ये दोघांनी आपल्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य केलं आहे. 


रितेश-जिनिलियाच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घ्या...


रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची पहिली भेट 2002 मध्ये 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर झाली. जिनिलियाने सुरुवातीला रितेशकडे दुर्लक्ष केलं होतं. रितेश हा श्रीमंत घरातील बिघडलेला मुलगा असल्याचं जिनिलियाला वाटायचं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली. 'तुझे मेरी कसम' या सिनेमानंतर त्यांनी 'मस्ती' या सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोडी ते लग्नबंधनात अडकले. रितेश-जिनिलायाचं लग्न ख्रिशन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीत झालं होतं. 


रितेशने जिनिलियाला पहिली भेटवस्तू काय दिली होती? 


रितेश देशमुखने जिनिलियाला पहिल्यांदा एक गुलाब भेट म्हणून दिलं होतं. जिनिलियाने आज वीस वर्षांनंतरही ते गुलाब जपून ठेवलं आहे. एका पुस्तकात तिने हे फुल सांभाळून ठेवलं आहे. लाडक्या व्यक्तीकडून मिळालेली पहिली भेटवस्तू ही कायमच स्पेशल असते. रितेश-जिनिलियासाठीदेखील त्यांची भेटवस्तू ही खास आहे.






अन् 30 दिवस पत्र लिहिले : रितेश देशमुख


रितेश देशमुख म्हणाला,"जिनिलिया आणि मी रिलेशनमध्ये असताना आजच्यासारख्या व्हिडीओ कॉलसारख्या गोष्टी नव्हत्या. तसेच आऊटडोर शूटिंगदरम्यान कॉल किंवा मेसेज करणं हे खूप महागात पडत होतं. एकदा माझं न्यूयॉर्कमध्ये शूटिंग सुरू होतं तर दुसरीकडे जिनिलिया दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत होती. त्यावेळी आम्ही एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी पत्र लिहिण्याचं ठरवलं. आम्ही 30 दिवस एकमेकांना पत्र लिहित होतो. आजही आम्ही ते जपून ठेवले आहेत. 


स्वप्नवत लग्न..


'मस्ती' या सिनेमाच्या वेडिंग सीक्वेंसच्या आठवणीबद्दल बोलताना रितेश म्हणाला,"वेडिंग सीक्वेंससाठी आम्ही वर आणि वधू म्हणून तयार झालो होतो. त्यावेळी त्या लूकमध्ये आम्ही एकत्र काही फोटोही काढले होते. त्यावेळी आम्ही खऱ्या आयुष्यात संसार थाटू असं आम्हाला वाटलं नव्हतं. या शूटिंगदरम्यान जेव्हा मी जिनिलियाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा मला सगळं स्वप्नवत वाटत होतं.


संबंधित बातम्या


Riteish Deshmukh Genelia : रितेश-जिनिलिया तिसऱ्यांदा आई-बाबा होणार? 'त्या' व्हिडीओमुळे रंगली चर्चा