Panchayat 3 Poster : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. ओटीटीवर रिलीज झालेल्या 'पंचायत' (Panchayat) सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता या सीरिजच्या आगामी भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'पंचायत 3' (Panchayat 3) या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. 


'पंचायत' ही सीरिज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. 'पंचायत 3'च्या सेटवरील एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'पंचायत 3' या सीरिजमधील सचिव अभिषेक त्रिपाठी (जितेंद्र कुमार) यांचा फर्स्ट लुक समोर आला आहे. वेब सीरिजमध्ये आणखी काही कलाकारांची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे 'पंचायत 3' या सीरिजबद्दलची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


'पंचायत 3'ची चाहत्यांना प्रतीक्षा


अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने सोशल मीडियावर 'पंचायत 3' या वेबसीरिजमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांची सीरिजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. एका फोटोमध्ये सचिवच्या भूमिकेत झळकणारे अभिनेते जितेंद्र कुमार पाठीवर बॅग ठेऊन मोटरसायकलवरुन जाताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या मोटरसायकलवर सामानदेखील बांधलेलं दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये बनराकस आणि विनोदसह तीन लोक दिसत आहेत. 




'पंचायत 3' या सीरिजची झलक चाहत्यांसोबत शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,"वाट पाहणं ही खूप कठीण गोष्ट असते, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत सेटवरील एक खास गोष्ट घेऊन आलो आहोत. प्राइमवर 'पंचायत 3". 'पंचायत 3'च्या पोस्टरवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'पंचायत 3' कधी येणार? माझी आवडती सीरिज, आता फक्त 'पंचायत 3'ची प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'पंचायत'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या... (Panchayat Starcast)


'पंचायत' सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. या कौटुंबिक सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीता गुप्ता, चंदन रॉय, फैसल मलिक, अशोक पाठव, पंकज झा, सुनीता राजवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता चाहते 'पंचायत 3' या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


संबंधित बातम्या


Panchayat 2 Web Series : फुलेरा नाही तर मध्य प्रदेशमधील 'या' गावामध्ये झालं पंचायत-2 चे शूटिंग; जाणून घ्या...