Riteish Deshmukh Genelia Deshmukh Welcomes Ganapati Bappa : सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन (Ganeshotsav 2023) झालं आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यांचा यंदाचा बाप्पा खूप खास आहे. रितेश-जिनिलियाच्या मुलांनी 'रिसायकल बाप्पा' बनवत आरती गायली आहे.
रियान आणि राहिल या रितेश-जिनिलियाच्या मुलांनी बाप्पाची मूर्ती घडवण्यात हातभार लावला आहे. रितेश-जिनिलिया यांनी गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रियान आणि राहिल बाप्पाची मूर्ती घडवत असून मराठीमध्ये बाप्पाची आरती गाताना दिसत आहे. 'सुख करता दुख हर्ता, वार्ता विघ्नाची' ही आरती ते म्हणत आहेत.
रितेशने शेअर केला व्हिडीओ (Riteish Deshmukh Shared Video)
अभिनेता रितेश देशमुखने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"गणपती बाप्पा मोरया...गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करतो. रियान आणि राहिलच्या आग्रहामुळे यंदा रिसायकल थीमने मूर्ती घडवली आहे". रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आदर्श संस्कार देत आहात मुलांना, गणपती बाप्पा मोरया, महाराष्ट्राची संस्कृती जपताय आपण..खरचं आज साहेबांची खूप आठवण येत आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत".
देशमुखाच्या घरी गणेशोत्सवाचा उत्साह
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या घरी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. रितेश-जिनिलिया नेहमीच रियान आणि राहिलला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतात. आता त्यांनी लोखंडाच्या पार्ट्सपासून रिसायकल बाप्पाची मूर्ती बनवली आहे. थोडी हटके बाप्पाची मूर्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिल्याने देशमुख कुटुंबियांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. काही दिवसांपूर्वी जिनिलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. रितेश-जिनिलियाचा 'वेड' (Ved) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
संबंधित बातम्या