Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 'सैराट' (Sairat) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत पोहोचली आहे. पहिल्या सिनेमाने अभिनेत्री ब्रेक मिळाला. या सिनेमात तिने साकारलेली आर्चीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. 'सैराट' फेम रिंकू राजगुरू कधीच लग्न करणार नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.


नेमकं प्रकरण काय? 


अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर 'आस्क मी अ क्वेशन' हे सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी एका चाहत्याने रिंकूला लग्नच करू नकोस, असा सल्ला दिला. त्या चाहत्याला उत्तर देत अभिनेत्रीने 'डन' असं म्हटलं. 



'आस्क मी अ क्वेशन'मध्ये एका चाहत्याने रिंकूला विचारलं की,"मराठीमधील तुझं आवडतं गाणं कोणतं?". याचं उत्तर देत अभिनेत्रीने लिहिलं की,"जोगवा". एका चाहत्याने विचारलं की,"केदारनाथची ट्रिप कशी झाली". याचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली,"अविस्मरणीय". तसेच आवडता पदार्थ पुरणपोळी असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.


रिंकू राजगुरूबद्दल जाणून घ्या... (Marathi Actress Rinku Rajguru Details)


‘सैराट’ या सिनेमाच्या माध्यमातून रिंकू राजगुरूने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या सिनेमाने अवघ्या चित्रपटसृष्टीत कल्ला केला होता. या सिनेमामुळे रिंकूला जगभरात ‘आर्ची’ म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. पहिल्याच चित्रपटातून रिंकू चाहत्यांची लाडकी अभिनेत्री बनली होती. ‘सैराट’नंतर रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय ती नुकतीच ‘झुंड’ या चित्रपटात झळकली होती.




‘झुंड’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. रिंकूसोबतच या चित्रपटात ‘सैराट’ चित्रपटातील ‘परशा’ म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर देखील झळकला होता. ‘स्लम सॉकर’चे संस्थापक विजय बोरसे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. आता रिंकू राजगुरूच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे. प्रेक्षकांची लाडकी आर्ची आता 'झिम्मा 2' या बहुचर्चित सिनेमात झळकणार आहे.


संबंधित बातम्या


Jhimma 2 : 'झिम्मा 2'मध्ये रिंकू राजगुरूची एन्ट्री! परश्या असणार सिद्धार्थ चांदेकर?