Ribbhu-Kirtida Wedding : 'ये है मोहब्बते' (Ye Hai Mohabbatein) फेम अभिनेता रिभू मेहरा (Ribbu Mehra) लवकरच त्याची गर्लफ्रेंड आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री कीर्तिदा मिस्त्रीसोबत (Kirtida Mistry) लग्नबंधनात अडकला आहे. दिल्लीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. आता त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


लग्नसोहळ्याच्या फोटोंमध्ये कीर्तिदा खूपच सुंदर दिसत आहे. तिने बेज रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर दुसरीकडे रिभूनेदेखील याच रंगाची शेरवानी परिधान केली आहे. लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत रिभू आणि कीर्तिदाने लिहिलं आहे,"मिस्टर अॅन्ड मिसेस मेहरा... सर्वात आधी रुची शर्माने आमच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी केल्याबद्दल तिचे आभार. गेल्या तीन दिवसांपासून हा लग्नसोहळा सुरू आहे. आमच्या आनंदात सहभागी झालेल्या सर्वांचे खूप-खूप आभार". 






रिभू मेहरा आणि कीर्तिडाची फिल्मी लव्हस्टोरी (Ribbu Mehra Kirtida Mistry Love Story)


रिभू मेहरा आणि कीर्तिडाची (Ribbu Mehra Kirtida Mistry)  लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. शाहराख खानच्याा 'कुछ कुछ होता है' या सिनेमातील कथेप्रमाणे त्यांची लव्हस्टोरी आहे. रिभू आणि कीर्तिडा 2013 साली फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. झाली. त्यानंतर ते मुंबईत पहिल्यांदा एकमेकांना भेटले. रिब्बू 'कुमकुम भाग्य' या लोकप्रिय मालिकेत शेवटचा दिसला आहे. तर दुसरीकडे कीर्तिदाने 'मुस्कान', 'पिया रंगरेज','शंकर जयकिशन 3 इन 1' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 2015 साली 'पिया रंगरेज' या मालिकेच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'बहुत प्यार करते है' या मालिकेत कीर्तिदा आणि रिभूने एकत्र काम केलं आहे. 


रिभू मेहरा आणि कीर्तिडा 23 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. करण वाही, करण वीर ग्रोवर, दीपिका सिंह गोयल, चारु असोपासह अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारांनी रिभू आणि कीर्तिडाला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा आहे. चाहतेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


संबंधित बातम्या


Bhagya Dile Tu Mala : पारंपरिक पद्धतीने पार पडणार राज-कावेरीचा लग्नसोहळा! रंगणार दोन तासाचा विशेष भाग