Akshay Kumar Selfiee Box Office Collection : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमीचा (Emraan Hashmi) 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची कथा आणि कलाकारांपेक्षा सिनेमा सुपरफ्लॉप झाल्यामुळे चर्चेत आहे. 'सेल्फी' या सिनेमाकडून खिलाडी कुमारच्या चाहत्यांची खूप अपेक्षा होती. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. 


'सेल्फी' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Selfiee Box Office Collection) 


'सेल्फी' हा बहुचर्चित सिनेमा 24 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने फक्त 3.13 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 1.30 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 1.80 कोटींची कमाई केली आहे. 'सेल्फी' हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत होता. पण आता या सिनेमाच्या कमाईचे आकडे खूपच निराशाजनक असल्याचं दिसत आहे. 






'सेल्फी' या सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहताने केलं आहे. राजने याआधी अक्षयसोबत 'गुड न्यूज' या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा 2019 साली सुपरहिट ठरला होता. त्यामुळे 'सेल्फी' प्रदर्शित होण्याआधी राज मेहता आणि खिलाडी कुमारची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल असे म्हटले जात होते. पण तसे काहीही घडलेले नाही. या सिनेमाकडे सिनेरसिकांनी आणि अक्षयच्या चाहत्यांनी पाठ फिरवली आहे. 


'सेल्फी' या सिनेमाचं कथानक काय? (Selfiee Movie Story) 


'सेल्फी' या सिनेमात अक्षय कुमार सुपरस्टार विजय कुमारच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाशमीने त्याच्या चाहत्याची भूमिका साकारली आहे. सेलिब्रिटीसोबत एक सेल्फी मिळवण्यासाठी वेड्या झालेल्या एका चाहत्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. इमरान हाशमी हा आरटीओ ऑफिसर असून तो अडचणीत सापडलेल्या अक्षय कुमारची म्हणजेच विजय कुमारची कशी मदत करतो याचा गंमतीशीर प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. पण त्यानंतरही विजय चाहत्याला एक 'सेल्फी' देतो का हे प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमात अक्षय आणि इमरानसह नुसरत भरुचा आणि डायना पेंटीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राज मेहताने या सिनेमात दिग्दर्शन केलं असून करण जौहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 


संबंधित बातम्या


Selfiee Box Office Collection : अरेरे! अक्षय कुमारचा 'सेल्फी' रिलीजच्या पहिल्याच दिवशी सुपरफ्लॉप; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...