RRR Oscar 2023 : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या अमेरिकेत असून तो आता  ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळ्याच्या तयारीला सुरुवात करणार आहे. येत्या 12 मार्चला 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा (95th Academy Awards) पार पडणार आहे. सध्या राम चरण अमेरिकेत 'आरआरआर' (RRR) या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास असणार आहे. या सोहळ्यात राम चरण 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) गाण्यावर थिरकणार आहे. 


एमएस किरावनीच्या 'नाटू नाटू' या गाण्याला 'ऑस्कर 2023'मध्ये ओरिजनल सॉंग (Best Score Academy Award) या विभागात नामांकन मिळालं आहे. आता पुरस्कार सोहळ्यात सिनेमातील या गाण्यावर राम चरण थिरकणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या पुरस्कार सोहळ्यात तो त्याच्या आगामी सिनेमांचं प्रमोशनदेखील करणार आहे. 






राम चरण म्हणाला,"नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करायला मला आवडतं. या गाण्यावर कुठेही आणि कधीही डान्स करायला मी तयार असतो. 'नाटू नाटू' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सिनेमातील या गाण्यावर डान्स करायला लावतात. आता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या गाण्यावर डान्स करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल". 


'नाटू-नाटू' या गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये झालं आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या निवासस्थानाबाहेर या गाण्याचं शूटिंग झालं आहे. ऑस्करआधी 'नाटू नाटू' या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात (Golden Globe Awards 2023) सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग मोशन पिक्चर या कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला होता. 


'आरआरआर'बद्दल जाणून घ्या...


'आरआरआर' (RRR) हा सिनेमा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एसएस राजामौलीने  (SS Rajamouli) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (JR Ntr) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. भारतासह परदेशातदेखील या सिनेमाचं कौतुक होत आहे. आता 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'ओरिजनल सॉंग'चा पुरस्कार मिळेल का? याकडे भारतीय सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या


Oscar Nominations 2023: ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका!  नाटू नाटू गाण्याला मिळालं नॉमिनेशन