Rhea Chakraborty : अभिनेत्री रिआ चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Shouvik Chakraborty) यांना मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. कारण तपासयंत्रणांनी बजावलेली लुक आऊट नोटीस ही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान दिलेल्या मुदतीत परदेशातून परत आल्यानंतर, रियानं लुक आउट नोटिस रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयाकडून ही नोटीस रद्द करण्यात आलीये. 


या प्रकरणात सीबीआयकडून कोर्टाच्या अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच सीबीआयने रियाच्या मागणीला देखील विरोध केला होता. हा गुन्हा पाटण्यात दाखल करण्यात आला असून याचा तपास दिल्ली सीबीआयकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय आदेश देऊ शकत नाही, अशी भूमिका सीबीआयने घेतली आहे. तसेच सीबीआय या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 


सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियाचं नाव चर्चेत


अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या वांद्रे येथील घरामध्ये आत्महत्या केली. त्यानंतर यामध्ये अनेक सेलिब्रिटींची नावं समोर येत आहे. त्यातूनच रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. सुशांतच्या प्रकरणात रियाची चौकशी सुरु असतानाच तिला सीबीआयकडून ही नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान रिआयने सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर करण्यात आलाय. तसेच चौकशीदरम्यान रियाच्या अनेक वागणुकीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहे. त्याचमुळे या प्रकरणात रियाला ही लुक आऊट नोटीस बजावण्यात आली, ज्याला रियाने आव्हान दिले होते. पण आता ही नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. 


ही बातमी वाचा : 


Shiv Thakare ED Summons: 'बिग बॉस 16' चे स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दु रोजिकला ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे समन्स, नेमकं प्रकरण काय?