Shiv Thackeray and abdu rozik ED Summons :  'बिग बॉस 16' चे स्पर्धक शिव ठाकरे (Shiv Thackeray ED Summons) आणि अब्दु रोजिक (Abdu Rozik) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आले आहे. . एका हाय-प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी या दोघांनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. हे प्रकरण कथित ड्रग माफिया अली असगर शिराझीशी संबंधित  असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.  वृत्तानुसार, या प्रकरणात साक्षीदार शिव आणि अब्दुचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. 


वृत्तानुसार,  अली असगर शिराझी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवत होता. ही कंपनी वेगवेगळ्या स्टार्टअप्सना फायन्सास पुरवत होती. या स्टार्टअपमध्ये शिव ठाकरेच्या 'ठाकरे टी अँड स्नॅक्स' या स्नॅक्स  रेस्टॉरंटचा आणि अब्दु रोजिकच्या 'बर्गीर' या फास्ट फूड स्टार्ट-अप देखील समावेश आहे. त्यामुळे या दोघांनाही ईडीकडून नोटीस देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 






शिव आणि अब्दुने रद्द केले कंत्राट


दरम्यान अली असगरच्या या कंपनीने नार्को  फंडिंगच्या माध्यमातून पैसा कमावल्याचा आरोप आहे. हे पैसे त्याने हसलर्स हॉस्पिटॅलिटी या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक म्हणून देण्यात आल्याचं समोर आलं. तसेच त्याने अनेक स्टार्टअपमध्येही मोठी गुंतवणूक केल्याचं पाहायला मिळालं. ही बातमी जशी समोर आली तेव्हाच शिव आणि अब्दु या कंपनी सोबतचे त्यांचे कंत्राट रद्द केले. पण सध्या तरी ईडीकडून या दोघांनाही समन्स बजावण्यात आले आहे. 


शिव आणि अब्दु हे बिग बॉस 16 च्या घरात एकत्र होते. त्याचवेळी त्यांची ओळख झाली होती. तसेच शिव हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता देखील आहे. बिग बॉसनंतर या दोघांनीही स्वत: चा व्यवसाय सुरु करत रेस्टॉरंट देखील सुरु केले. 






ही बातमी वाचा : 


Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding : रकुल प्रीत सिंह जॅकी भगनानीसोबत अडकली लग्नबंधनात; पहिला फोटो समोर