Rakul Preet Singh Jackky Bhagnani : बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षीत विवाह सोहळ्यांपैकी एक असलेला जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांचा विवाहसोहळा (Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding) मोठ्या उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यात दोन्ही कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. मात्र, या लग्नसोहळ्यात अभिनेता रितेश देशमुखचा (Ritesh Deshmukh) धाकटा भाऊ धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांचीच जोरदार चर्चा झाली. धीरज देशमुख हे वासू भगनानी (Vashu Bhagnani) यांचे जावई आहेत. भगनानींचे जावई असलेल्या देशमुखांच्या एका कृतीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. 


रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकले. या विवाह सोहळ्यासाठी पापाराझी, फोटोग्राफर यांनीदेखील गर्दी केली. विवाह सोहळा पार पडल्यानंतर वासू भगनानी यांचे जावई असलेले  आमदार धीरज देशमुख हे  पत्नी आणि मुलीसह हॉटेलच्या बाहेर आले. देशमुख यांनी मेहुणा जॅकीच्या विवाहानिमित्ताने मिठाई वाटण्यास सुरुवात केली. 


काय झाले नेमकं? 


धीरज देशमुख हे  पत्नी दीपशिखासह मिठाई वाटण्यासाठी आल्यानंतर फोटोग्राफर्स, पापाराझींनी त्यांना फोटोसाठी विनंती केली. त्यावर धीरज यांनी आपण फोटो नंतर काढूयात, पण आधी तुम्ही मिठाई घ्या अशी विनंती केली आणि मिठाई वाटण्यास सुरुवात केली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देताना धीरज देशमुखांचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले की, धीरज आणि त्यांची फॅमिली किती चांगली आहे. आदराने मिठाई वाटप करत आहेत. तर, एका युजरने धीरज-दीपशिखा यांच्या मुलीचे कौतुक केले. 






 


रकुल-जॅकीच्या लग्नाला गोव्यात सेलिब्रिटींची मांदियाळी


रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नसोहळ्याला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, वरुण धवन, नताशा दलाल, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, डेव्हिड धवन, महेश मांजरेकरसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर रकुल आणि जॅकी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


चित्रपट निर्माती आहे दीपशिखा देशमुख


धीरज देशमुख यांच्या पत्नी दीपशिखा देशमुख या चित्रपट निर्माती आहेत. पूजा एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत त्यांनी चित्रपट निर्मिती केली आहे. सरबजीत या चित्रपटाच्या निर्मितीने दीपशिखा यांनी 2016 मध्ये चित्रपट निर्माती म्हणून पाऊल ठेवले. मदारी, जवानी जानेमन, बेलबॉटम आदी चित्रपटांची निर्मिती केली.