एक्स्प्लोर

REVIEW : आहे 'गोल्ड' तरी...

पुढे दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला. त्यामुळे तीन ऑलिम्पिक रद्द झाली आणि जाहीर झालं 1948 चं ऑलिम्पिक, जे इंग्लंडमध्ये होणार होतं. या स्पर्धेत स्वतंत्र भारताचा संघ उतरवण्याचं स्वप्न तपन पाहतात. टीम गोळा करतात आणि मग पुढे काय होतं ते आपल्या सगळ्यांना माहित आहेच. तो इतिहासच आहे.

गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारने अस्सल सिनेमांचा धडाका लावला आहे. अस्सल अशासाठी की या सिनेमांमध्ये सामाजिक संदेश असतोच. पण त्याही पलिकडे यात मनोरंजनमूल्य ठासून भरलेलं असतं. पॅडमॅन, टॉयलेट, एअरलिफ्ट, बेबी, जॉली एलएलबी २ ही त्याची काही पटकन तोंडावर येणारी नावं. आता तो आपल्यासमोर 'गोल्ड' हा सिनेमा घेऊन येतोय. सिनेमाची गोष्ट प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशीच आहे. त्यात त्यातली मुख्य भूमिका अक्षयच्या वाट्याला आली आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं की हा सिनेमा रीमा कागतीचा आहे. रीमाने फरहान अख्तर, झोया अख्तरसोबत अनेक सिनेमांना साह्य केलं आहे. शिवाय हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडही तिचा. तर अशी दिग्दर्शिका 'गोल्ड'सारख्या विषयात हात घालताना अक्षयला सोबत घेते तेव्हा, हा सिनेमा काहीतरी भन्नाट अनुभव देणार असं वाटतं. निदान तशी अपेक्षा असते. 'गोल्ड'चं कथानक कमाल आहे. त्याची पटकथा रचताना मात्र त्यात जरा गडबड झाली आहे. म्हणजे, असं की 1936 मध्ये जर्मनीत ऑलिम्पिक झालं होतं. त्यावेळी भारतीय संघाने सुवर्ण पदक मिळवलं. पण ते ब्रिटिशांकडून खेळले. त्यावेळी तिथे ब्रिटिश झेंड्याऐवजी आपला झेंडा म्हणजे, स्वतंत्र भारताचा झेंडा तिथे फडकायला हवा होता असं काहींना वाटून गेलं. त्यातले एक तपन दास. तपन त्यावेळी त्या संघाचे मॅनेजर होते. पुढे दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला. त्यामुळे तीन ऑलिम्पिक रद्द झाली आणि जाहीर झालं 1948 चं ऑलिम्पिक, जे इंग्लंडमध्ये होणार होतं. या स्पर्धेत स्वतंत्र भारताचा संघ उतरवण्याचं स्वप्न तपन पाहतात. टीम गोळा करतात आणि मग पुढे काय होतं ते आपल्या सगळ्यांना माहित आहेच. तो इतिहासच आहे. ही गोष्ट खरंच कमाल आहे. या निमित्ताने तपन यांच्या तपश्चर्येची, त्यावेळच्या खेळाडूंच्या जिगरी खेळाची आठवण आपल्या सर्व भारतीयांना होईल. पण आता त्या पलिकडे आपण पटकथेचा विचार करतो. त्यावेळी मात्र बऱ्याच त्रुटी यात दिसतात. पहिली सगळ्यात मोठी उणीव अशी की तो सिनेमा त्या काळातला वाटत नाही. तो सतत आजच्या काळाचा चकचकीतपणा दाखवत राहतो. यातली गाणी सगळी आजच्या काळातली वाटतात. त्याला किमान एक रेट्रो साऊंड हवा होता तो इथं नाही. अनेक प्रसंग यात ओढून ताणून, विनोद निर्मिती करायची म्हणून यात आणलेत की काय असं वाटत राहतं. उदाहरणार्थ, उत्तरार्धातली हॉकी फेडरेशनमधली ठसन, तपनला बेअब्रू करण्यासाठी घातला जाणारा घाट हा सगळ्या बनावट वाटतो. ब्रिटनमध्ये ऑलिम्पिक खेळायला गेल्यानंतर अशी कूटनिती तीही 1948 साली वापरलेली ही उगाच घेतलेली सिनेमॅटिक लिबर्टी वाटते. अक्षय कुमारचा तपन दिसायला छान आहे. पण त्यानेही उगाच नको तिथे विनोद निर्मिती केली आहे. म्हणजे, हॉकी फेडरेशनचे लोक त्याला भेटायला आल्यावर तपन त्याचं गुणगान गाऊ लागतो. यावर ते म्हणतात, बस बस.. अब जादा मस्का मत लगाओ. यावर तपन म्हणतो, आप क्या ब्रेड है, आपको मस्का लगाऊ.. हे असे डायलॉग आपल्याला मराठी विनोदी कार्यक्रमांची आठवण करुन देतात. उत्तरार्धातलं पियक्कड गाणंही उगाच घेतलेलं असं वाटत राहतं. अक्षयने गेल्या काही काळात दिलेल्या सिनेमांची यादी पाहिली तर त्याच्या सिनेमात, लॉजिकही असतं आणि त्यात रंजनही असतं. विशेषत: गेल्या काही काळात आलेले त्याचे सिनेमे हे सत्य घटनांवर बेतलेले होतेच, शिवाय, त्यात योग्य ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली दिसली. इथे मात्र तसं होतं नाही. इथे सोयीनुरुप घेतलेली लिबर्टी सतत दिसत राहते. एक नक्की यात कामं मात्र सगळ्यांनीच मस्त केली आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो, अमित साध, सनी कौशल, विनितकुमार यांचा. यांच्यासह सगळ्याच टीमने चोख काम केलं आहे. सिनेमाची गोष्ट सिनेमापेक्षा सरस असल्यामुळे सिनेमा कौतुकास्पद ठरतो. याची पटकथा आणखी कसून बांधायला हवी होती असं वाटून जातं. एकूणात भारतीय संघाने बजावलेलं हे कर्तृत्व पाहायला हरकत नाही. परंतु या सिनेमाची पटकथा आणखी कसून बांधली असती तर या 'गोल्ड'ची झळाळी आणखी वाढली असती यात शंका नाही. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला देतोय, अडीच स्टार.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Janai Bhosle On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget