एक्स्प्लोर

स्मृती दिन विशेष : अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटीलबद्दलच्या रंजक गोष्टी

वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती.

मुंबई : अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. आपल्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अप्रतिम कलाकृती दिल्या आहेत. हिंदी सिनेमांसाठीच्या योगदानामुळे आजही त्यांना एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती. स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला होता. आपल्या सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली स्मिता पाटील गंभीर भूमिकांमध्ये जास्त रमली. तिच्या सशक्त अभिनयाची छाप उंबरठा, भूमिका, जैत रे जैत, निशांत, मंथन आदी चित्रपटांनी प्रेक्षकांवर पाडली आहे. पण गंभीर अभिनयासाठी ओळखली जाणारी स्मिता खऱ्याखुऱ्या आयुष्यात खोडकर होती. मुंबई दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून स्मिता पाटील यांचं करिअर सुरु झालं. अभिनेता राज बब्बरसोबतच्या प्रेमामुळे स्मिता पाटील चर्चेत आल्या. राज बब्बर विवाहित असूनही स्मिता पाटीलशी लग्न करण्यास तयार झाले. यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला. स्मिता पाटील यांच्या करिअरमध्ये भूमिका, मंथन, मिर्च मसाला, अर्थ, मंडी, निशांत तसंच नमक हलाल आणि शक्तीसारख्या सिनेमांचा वाटा मोलाचा आहे. आपल्या करिअरची सुरुवात स्मिताने अरुण खोपकरांच्या डिप्लोमा या सिनेमापासून केली. स्मिता पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 1977 साली भूमिका आणि 1980 मध्ये चक्र या चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसंच 1978च्या जैत रे जैत आणि भूमिका, 1981 साली उंबरठा, 1982 साली चक्र, 1983 मध्ये बाजार, 1985 मध्ये आज की आवाज या सिनेमांसाठी फिल्मफेअरनेही स्मिता पाटील यांना गौरवलं गेलं आहे. मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर 13 डिसेंबर 1986 ला वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. संबंधित बातम्या  बिग बींबाबत स्मिता पाटील यांचं 'ते' वाईट स्वप्न!   स्मिता...   अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटीलबद्दलच्या रंजक गोष्टी    बर्थडे स्पेशल : अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटीलबद्दलच्या रंजक गोष्टी      जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
Embed widget