HIT: The First Case : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) सध्या त्यांच्या आगामी 'हिट- द फर्स्ट केस' (HIT: The First Case) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'तिनका' (Tinka) हे गाणं रिलीज झालं आहे. 


'तिनका' गाणं आऊट


'हिट- द फर्स्ट केस' या सिनेमातील 'तिनका' हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचे बोल मनन भारतद्वाज यांनी लिहिले आहेत. तर जुबिल नौटियालने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं भावनिक असून या गाण्यात राजकुमार राव भटकताना दिसत आहे. 'हिट- द फर्स्ट केस' या सिनेमात राजकुमार राव एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सान्या मल्होत्रा त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. 


'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला 


'हिट- द फर्स्ट केस' या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता राजकुमार राव एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सान्या मल्होत्रादेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना 15 जुलैला पाहायला मिळणार आहे. 


दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक


'हिट- द फर्स्ट केस' हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'हिट' या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. सिनेमात एका अशा पोलिसाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो एका महिलेचा शोध घेत आहे. 'हिट - द फर्स्ट केस'  या चित्रपटामधून पहिल्यांदाच राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 



संबंधित बातम्या


HIT The First Case Teaser Out : राजकुमार रावच्या 'हिट'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित


HIT-The First Case Release Date : राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राच्या 'हिट' ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित