HIT-The First Case Release Date : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) यांचा 'हिट-द फर्स्ट केस'  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाची शूटिंग गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये संपली. आता या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शनं सोशल मीडियावर  'हिट - द फर्स्ट केस' (HIT-The First Case) या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


'हिट- द फर्स्ट केस' हा चित्रपट  2020 मध्ये रिलीज झालेल्या 'हिट' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन  डॉ शैलेश कोलानू  यांनी केलं.   'हिट - द फर्स्ट केस'  हा चित्रपट 15 जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.  चित्रपटामध्ये एका अशा पोलिसाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो एका महिलेचा शोध घेत आहे. 'हिट - द फर्स्ट केस'  या चित्रपटामधून पहिल्यांदाच राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 


सध्या बॉलिवूडमध्ये अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकची निर्मिती केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरचा जर्सी हा चित्रपट रिलीज करण्यात आला. हा चित्रपट देखील एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. 


राजकुमार रावच्या बधाई दो या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये भूमि पेडणेकरनं देखील प्रमुख भूमिका साकारली. तसेच सान्या मल्होत्रा ही  पगलैट आणि मीनाक्षी सुंदेश्वर या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. 







गेल्या वर्षी राजकुमार रावनं अभिनेत्री पत्रलेखासोबत लग्नगाठ बांधली. 2010 पासून एकत्र असलेल्या राजकुमार आणि पत्रलेखाने चंदीगढमधील ओबोरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा पार पडला. फराह खान आणि अभिनेता साकिब सलीम व्यतिरिक्त दोघांच्या खास मित्रांनी लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. राजकुमार आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या विविह सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. 


महत्वाच्या बातम्या :