Rekha Dance Steps Viral on Jamal Kudu : रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. या चित्रपटातील सीन्स, गाणी आणि डान्स स्टेप्स चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तसेच बॉबी देओलच्या एन्ट्री सॉन्ग 'जमाल कुडू'नेदेखील (Jamal Kudu) चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा 'जमाल कुडू' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
डोक्यावर व्हिस्कीचा ग्लास आणि मस्तमौला डान्स. 'अॅनिमल'मधील बॉबी देओलचा डान्स एवढा गाजेल असा कोणी विचारच केला नव्हता. पण आता सोशल मीडियावर या गाण्यावरील रेखाचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. रेखाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉबी देओलआधी 36 वर्षांपूर्वी रेखाने जमाल कुडू गाण्यावर डान्स केला असल्याचं म्हटलं जात आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर हे गाणं एडिट केलं असल्याचं कळून येत आहे.
रेखाने केला 'जमाल कुडू' डान्स!
रेखाने डोक्यावर व्हिस्कीचा ग्लास घेतलेला व्हिडीओ हा 1988 मध्ये आलेल्या 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातील आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे,"रेखाने 1988 मध्ये जमाल कुडू स्टेप केल्या आहेत". पण रेखाचा हा डान्स 'सासू जी तुने मेरी कदर न जानी' या गाण्यातील आहे. रेखाच्या या आयकॉनिक डान्सला बॉबी देओलने मॉर्डन टच देण्याचा प्रयत्न केला आहे.
'बीवी हो तो ऐसी' या गाण्यात रेखासोबत सलमान खान आणि फारुख शेखदेखील दिसून येत आहे. रेखाचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. खरंतर अशापद्धतीचा डान्स करणारी रेखा पहिली अभिनेत्री नाही. रेखाआधी साधनाने 55 वर्षांपूर्वी आलेल्या इंतकाम चित्रपटात डोक्यावर व्हिस्कीचा ग्लास घेऊन मस्त डान्स केला होता. बॉबी देओल आणि रेखाप्रमाणे साधनाचा डान्स व्हिडीओदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
संबंधित बातम्या