Rashmika Mandanna  : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) यांच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचे चाहते पुष्पाः2 म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa: The Rule) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या या दुसऱ्या पार्टमध्ये पहिल्या पार्ट प्रमाणेच ड्रामा, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. पुष्पा-2 बद्दल आता स्वत: रश्मिकानं एक खास अपडेट दिली आहे.  


काय म्हणाली रश्मिका? 


रश्मिका गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये रश्मिकानं पुष्पा-2 बाबत माहिती दिली. लवकरच ती पुष्पा-2 च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे, असं ती म्हणाली. 


 'अल्लू अर्जुन सरांसोबत, मी दोन दिवसांत पुष्पा 2 च्या शुटिंगला सुरुवात करत आहे. अमिताभ सध्या बच्चन सरांसोबत मी गुडबायचा या चित्रपटामध्ये काम केलं. या ट्रेलर प्रेक्षकांसमोर येत आहे, यावर मी काय बोलू? मी माझे स्वप्न जगत आहे इतकच मी सांगू शकते.' असं रश्मिकानं सांगितलं.


कधी रिलीज होऊ शकतो पुष्पा-2?


रिपोर्टनुसार, पुष्पा-2 हा चित्रपट ऑगस्ट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन,  फहाद फाजिल आणि  रश्मिका मंदाना हे पहिल्या पार्टचे कलाकार दिसतील. तसेच पुष्पा-2 मध्ये अभिनेता  विजय सेतुपती देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


रश्मिका करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण


रश्मिका ही गुडबाय या तिच्या आगामी चित्रपटामधून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट सात ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. रश्मिका या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. या बाप-लेकीच्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले होते.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: