Goodbye Movie : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या ‘गुडबाय’ (Goodbye) या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं बिग बी मजेशीर आणि हटक्या पद्धतीने चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. 


व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अमिताभ बच्चन हे त्यांच्या टीमसोबत चित्रपटाच्या प्रमोशनबद्दल चर्चा करत आहेत. प्रमोशनबाबत त्यांनी 25 तास चर्चा केली, असंही या व्हिडीओमध्ये या चित्रपटातील टीममधील व्यक्ती म्हणतो. व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन हे कुटुंबाबाबत बोलताना दिसत आहेत. 


रश्मिका मंदान्नानं दिली रिअॅक्शन
अमिताभ बच्चन यांचा हा मजेदार प्रमोशनल व्हिडिओ रश्मिका मंदानाने देखील शेअर केला आहे. इंस्टास्टोरीवर व्हिडिओ शेअर करताना रश्मिकाने लिहिले - 'पापा त्यांचे काम करत आहेत.' या कॅप्शनमध्ये रश्मिकाने फायर, हार्ट आणि लाफिंग इमोजी शेअर केले आहे. रश्मिका गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 


पाहा व्हिडीओ:






गुडबाय हा चित्रपट सात ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. रश्मिका या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. या बाप-लेकीच्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले होते. काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे सेटवरील पाळीव प्राण्यांसोबत खेळतानाचे फोटो व्हायरल झाले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदना यांच्याशिवाय नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: