एक्स्प्लोर
Advertisement
रणवीर सिंगला दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्कार
दादासाहेब फाळके पुरस्काराच्या स्वरुपाने रणवीरच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला जाणार आहे
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतच बॉलिवूडचा नवा सुपरस्टार रणवीर सिंगचाही दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्डने सन्मान होणार आहे. 'पद्मावत' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणवीरला गौरवण्यात येणार आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटात रणवीर सिंगने अल्लाऊद्दीन खिल्जीची व्यक्तिरेखा साकारली होती. सामान्य प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
'पद्मावत' हा बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा रणवीर सिंगचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. सिनेमात रणवीरसोबत दीपिका पदुकोण, शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होते.
अनुष्का शर्माला 'दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रदान होणार
दादासाहेब फाळके पुरस्काराच्या स्वरुपाने रणवीरच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला जाणार आहे. केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड्स वेगळे आहेत. दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड्स समितीने पत्र लिहून रणवीरचं अभिनंदन केलं. निर्मिती क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्मालाही याच पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement