Ranveer Singh In Don 3 : फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) 'डॉन 3' (Don 3) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली. या सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत असणार असे म्हटले जात होते. पण नंतर आता शाहरुखने या सिनेमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली. आता या सिनेमातील शाहरुख खानची जागा रणवीर सिंह (Ranveer Singh) घेणार असल्याचं समोर आलं आहे. 


रणवीर सिंह बनणार 'डॉन'


'डॉन 3' संदर्भात एक-एक अपडेट यायला सुरुवात झाली आहे. शाहरुखने या सिनेमाला नकार दिला असल्याचं समोर आलं होतं. आता नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 'डॉन 3' या सिनेमासाठी रणवीर सिंहला निर्मात्यांनी विचारलं असून त्यानेदेखील या सिनेमाला होकार दिला आहे. त्यामुळे आता निर्मात्यांनी 'डॉन 3'च्या तयारीला सुरुवात केली आहे. 


'डॉन 3'चा रणवीरला फायदा


'डॉन 3' या सिनेमाचा रणवीर सिंहला फायदा होणार आहे. रणवीर सिंह शेवटचा 'जयेशभाई जोरदार' या सिनेमात झळकला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. रणवीरचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत. त्यामुळे 'डॉन 3' या सिनेमाचा अभिनेत्याला फायदा होणार आहे. 'डॉन 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल, असे म्हटले जात आहे. 


शाहरुख खानने 'डॉन 3' नाकारला


पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान 'डॉन 3' या सिनेमात दिसणार नाही. शाहरुखने या सिनेमाची ऑफर नाकारल्याने निर्मात्यांनी एका बड्या या सिनेमासाठी विचारणा केली आहे. 'डॉन 3'च्या कथेबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून फरदान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यात चर्चा होत होत्या. कोरोनाकाळाआधीच या सिनेमाच्या कथेवर काम करायला सुरुवात झाली होती. पण आता या सिनेमामधून शाहरुखने मात्र माघार घेतली आहे. वेगळ्या पठडीतले सिनेमे करण्यासाठी शाहरुखने हा सिनेमा नाकारला असल्याचं समोर आलं आहे". 


'डॉन' चित्रपटाचे दोन्ही भाग ठरले सुपरहिट


फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या दोघांचे  एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस आहे. या दोन्ही निर्मात्यांनी मिळून 1978 साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटाचे राइट्स विकत घेतले. यानंतर 2006  साली डॉन चित्रपटाचा पहिला रिमेक प्रदर्शित झाला, ज्यामध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. पाच वर्षांनंतर 2011 मध्ये डॉन 2 रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला. हे दोन्ही चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केले होते. 


संबंधित बातम्या


Don 3: डॉन-3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट