Ranveer Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) चाहता वर्ग मोठा आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत.  गली बॉय रणवीर त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. आता रणवीरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. लंडनमधील मादाम तुसाद म्युझियममध्ये (Madame Tussauds London) रणवीर सिंहचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आला आहे. या  म्युझियममध्ये रणवीरचे एक नाही तर दोन मेणाचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. या मेणाच्या मुतळ्यांचे फोटो रणवीरनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


रणवीरनं शेअर केले फोटो


रणवीरनं त्याच्या दोन मेणाच्या पुतळ्यांचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,"मोठे झाल्यावर, जगातील काही प्रसिद्ध आणि प्रमुख व्यक्तींसोबत माझ्या आई-वडिलांचे जुने फोटो पाहून मला भुरळ पडली, फक्त ते लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसादमधील  आहेत हे मला नंतर कळाले. त्या पौराणिक वस्तुसंग्रहालयाचे आकर्षण मला वाटत होते, आता तेथे माझा स्वतःचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आले आहेत. माझा पुतळा जगातील सर्वात कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांमध्ये उभा असल्याने मला कृतज्ञता वाटते. एक अविस्मरणीय क्षण,मला या क्षणापर्यंत घेऊन गेलेल्या माझ्या जादुई सिनेमॅटिक प्रवासाचे मी चिंतन केले" 


फोटोमधील खरा रणवीर कोणता?


रणवीरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमधील मेणाचे पुतळे कोणते आणि खरा रणवीर कोणता? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. यामधील डोळ्यावर गॉगल असणारा खरा रणवीर आहे. तर पिंक जॅकेट परिधान केलेला आणि ब्लॅक प्रिंटेड कोट परिधान केलेला रणवीरचा मेणाचा पुतळा आहे. अनेक सेलिब्रिटींनी रणवीरनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 








रणवीरचा आगामी चित्रपट


रणवीर सिंहच्या हा लवकरच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील रणवीरचा फर्स्ट लूक  रिलीज करण्यात आला होता. या मल्टीस्टारर चित्रपटात रणवीर संग्राम भालेरावच्या भूमिकेत दिसणार आहे. सिंघम अगेनमध्ये  दीपरा पदुकोण, अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


संबंधित बातम्या:


Ranveer Singh : आला रे आला 'सिम्बा' आला...'Singham Again' सिनेमातील रणवीर सिंहचा फर्स्ट लूक आऊट!