Ranveer Singh Singham Again Post : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) हा बहुचर्चित सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

Continues below advertisement


'सिंघम अगेन' या सिनेमात नेहमीप्रमाणे सिंघम म्हणजेच अजय देवगनच्या (Ajay Devgn) अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. पण या सिनेमाची स्टारकास्टदेखील खूपच तगडी आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमात टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या कलाकारांचाही अॅक्शन मोड पाहायला मिळणार आहे. आता या सिनेमात रणवीरचा लूक आऊट झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 






रणवीरने शेअर केलं 'सिंघम अगेन'चं पोस्टर (Ranveer Singh Shared Singham Again Poster)


रणवीर सिंहने 'सिंघम अगेन' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये रणवीर सिंहचा धमाकेदार लूक पाहायला मिळत आहे. वर्दीतील त्याच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टर शेअर करत रणवीरने लिहिलं आहे,"सबसे नटखट, सबसे निर्जळ...आला रे आला सिम्बा आला". रणवीरच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सिंघम अगेन' (Singham Again Release Date)


रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर केले होते. या पोस्टरमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला. हे फोटो आणि कलाकारांचे फर्स्ट लूक पाहून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'सिंघम अगेन' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमासोबत 'सिंघम अगेन'ची टक्कर होणार आहे. 


'सिंघम' फ्रेंचाइजीचा तिसरा सिनेमा


अजय देवगन स्टारर 'सिंघम' फ्रेंचाइजीचा हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टी सांभाळणार आहे. या सिनेमात बाजीराव सिंघम अर्थात अजय देवगनसह सिम्बा लूकमध्ये रणवीर सिंह दिसणार आहे. या सिनेमात दोघेही शत्रूंचा सामना करताना दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


Singham Again : 'सिंघम अगेन' सिनेमातील दीपिका पदुकोणचा खतरनाक लूक समोर; रोहित शेट्टी म्हणाला,"सर्वात क्रूर ऑफिसर..."