Salaar Trailer Out: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) सालार (Prabhas) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सालार या चित्रपटाचा हा दुसरा ट्रेलर आहे. या आधी देखील या चित्रपटाचा एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता प्रभासच्या सालार या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत. तसेच या ट्रेलरमधील श्रुती हसन (Shruti Haasan) आणि पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांच्या लूकनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.
'सालार' च्या ट्रेलरमधील जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स (Salaar Trailer Out)
सालार या चित्रपटाच्या 2.53 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन्स बघून तुमच्या अंगावर शहारे येतील. या ट्रेलरमध्ये खानसार नावाच्या जंगलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. "खानसार की कहानी तब बदली जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए" हा डायलॉग सालार या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकू येतो. ट्रेलरमध्ये प्रभाससोबतच श्रुती हसन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या देखील झलक बघायला मिळत आहे.
पाहा ट्रेलर:
अभिनेता प्रभासनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सालार चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरची माहिती चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "खानसाराच्या हिंसक जगात प्रवेश करा"
सेन्सॉरकडून सालारला मिळालं 'A' सर्टिफिकेट
22 डिसेंबस रोजी प्रभासचा सालार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगु, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. सालार पार्ट 1 ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून (CBFC) म्हणजेच सेन्सॉरकडून'A' प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. या चित्रपटाचा रनटाइम 2 तास आणि 55 मिनिटे एवढा असणार आहे.
सालार चित्रपटाची स्टार कास्ट (Salaar Movie Star Cast)
सालार या चित्रपटात प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, टिनू आनंद, ईश्वरी राव, जगपती बाबू, श्रिया रेड्डी आणि गरुड राम यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. आता प्रभासचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या: