Darlings Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  आलिया भट (Alia Bhatt) तिच्या अभिनयानं सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील आलिच्या अभिनयाचं अनेकांची कौतुक केलं. आता लवकरच आलियाचा 'डार्लिंग्स' (Darlings) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये आलियानं प्रमुख भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, आलिया ही स्वत:च्या पतीचे अपहरण करुन पोलिसांकडे तक्रार करायला जाते. 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 


'डार्लिंग्स' चित्रपटामध्ये आलियाच्या पतीची भूमिका अभिनेता विजय वर्मानं साकारली आहे. शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यू या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकरली आहे. आलियानं या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिनं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी प्रोड्यूस केलेला हा पहिला सिनेमा, मी खूप उत्सुक. ' हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चित्रपटाचे संगीत चित्रपट निर्माता-संगीतकार विशाल भारद्वाज यांनी दिले आहे. चित्रपटाचे गीत हे ज्येष्ठ गीतका गुलजार यांनी लिहिले आहेत. 


पाहा ट्रेलर: 






डार्लिंग्स या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीन यांनी केलं आहे. तर आलिया भट्टच्या इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन आणि शाहरुख आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये आलियासोबतच रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


हेही वाचा:  


Darlings Official Teaser : 'क्या एक मेंढक और बिच्छू दोस्त हो सकते है?'; डार्लिंग्सचा धमाकेदार टीझर रिलीज