Deepika Padukone First Look From Pathaan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लुक आऊट झाला आहे. 


दीपिका पदुकोणचा 'पठाण' सिनेमातील लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात दीपिका अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. दीपिकाचा एक वेगळी लुक या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीपिका लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने दीपिकाचा लुक शेअर करत लिहिलं आहे,"तिला केवळ गोळीने घायाळ करण्याची गरज नाही".


'पठाण' सिनेमा हा शाहरुखच्या बहुचर्चित सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख पाच वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. टीझरमधून दीपिका आणि जॉन अब्राहमची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. 






25 जानेवारीला सिनेमा होणार प्रदर्शित


'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदने सांभाळली आहे. तर आदित्य चोप्राने या सिनेमाची निर्मिती केली आहे. टीझर आणि दीपिकाचा लुक आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमासाठी शाहरुखने 85 कोटींचे मानधन घेतलं आहे. या सिनेमात सलमान खानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


संबंधित बातम्या


Pathan : चार वर्षानंतर शाहरूख खान करतोय मोठ्या पड्यावर पुनरागमन ; 'पठाण' साठी घेतलं एवढं मानधन


30 Years Of Shah Rukh Khan: मनोरंजनविश्वात शाहरूखची ‘तिशी’! ‘पठाण’च्या रिलीज डेटसह शाहरुख खानचा नवा लूक प्रदर्शित!