Mahashivratri 2022 : बॉलिवूड अभिनेत्रींनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेमा मालिनी, कंगना रनौत, मौनी रॉयसारख्या अभिनेत्रींचा यात समावेश आहे. 


हेमा मालिनी
हेमा मालिनीने ट्विटरवर शंकराचा फोटो शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे, "तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा".





कंगना रनौत
कंगना रनौतने इंस्टाग्रामवर ईशा फाऊंडेशनचा फोटो शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्ट शेअर करत तिने लिहिले आहे, "शिवरात्रीच्या शुभेच्छा". 


रुबीना दिलैक
बिग बॉस फेम रुबीना दिलैकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ शेअर करत रुबीनाने 'हर हर महादेव' असे लिहिले आहे.  


मौनी रॉय 
मौनी रॉयने इंस्टाग्रामवर चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत काही फोटो शेअर केले आहेत. यात मौनी शंकराची पूजा करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने एक श्लोकही लिहिला आहे.



संबंधित बातम्या


Mahesh Manjrekar : ‘पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका’, महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!


Gangubai Kathaiwadi Collection Day 4 : बॉक्स ऑफिसवर ‘गंगुबाई काठियावाडी’ची जादू, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!


Mazhi Tuzhi Reshimgath : नेहाच्या आयुष्यात यशच्या रूपाने प्रेम येणार! परी करणार का नव्या नात्यांचा स्वीकार?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha