मुंबई: बॉलीवूडचे बादशहा आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन ट्विटरवर चांगलेच ॲक्टिव आसतात. बिग बींचे ट्विटरवर 47.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. भारतातील टॉप 3 ट्विटर सेलेब्रिटींमध्ये त्यांचा समावेश आहे. बिग बी फॉलोअर्सला ट्वीटद्वारे सतत नवीन माहिती देतात व अपडेट ठेवतात. त्याच्या कुटुंबाचे फोटो असोत किंवा काही भावनिक संदेश. यासोबतच ते चाहत्यांना त्यांच्या तब्येतीबाबतही अपडेट देत असतात. त्यांचे एक ट्वीट यावेळी चिंतेचा विषय बनला आहे.

अमिताभ बच्चन यांनी 27 फेब्रुवारीला एक ट्वीट केले होते. ट्वीट करून त्यांनी लिहिले की, "हृदयाचे ठोके वाढत आहेत, काळजी वाटत आहे." अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटने चाहत्यांची चिंता वाढवली. त्यांच्या तब्येतीबद्दल चाहते चिंतेत झाले. त्यांच्या या ट्वीटनंतर त्यांची प्रकृती ठीक नसल्याचा अंदाज अनेकजण लावत होते.

 

अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटचे सत्यअमिताभ बच्चन यांचा झुंड सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच बरोबर अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. शेयर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या संपूर्ण दिनक्रम शेअर केला आहे. त्यात कळते की ते कसे वयाच्या 79 वर्षी सुध्दा ते सायंकाळी 5.30 पर्यंत शूटिंग करतात आणि मड आयलंडवरून गाडी चालवून रात्री 8.30 वाजता त्यांच्या घरी जलसा पोहचतात. यावरून लक्षात येते कि बिग बींची तब्येत एकदम ठिक आहे आणि त्यांचे हे ट्वीट शूटिंगच्या थकव्यामुळे होते.

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपटबिग बी त्यांच्या कामात खूप व्यस्त आहेत. ते दररोज 10-12 तास काम करतात. वाढत्या वयामुळे चाहत्यांना त्यांची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. लवकरच अमिताभ बच्चन अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये 'झुंड', 'रनवे 34', 'उरंध मनिथन', 'गुड बाय', 'उच्छाई', 'प्रोजेक्ट के' आणि 'बटरफ्लाय' यांसारख्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha