Gangubai Kathaiwadi Collection : सलग चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 'गंगुबाई काठियावाडी'ची (Gangubai Kathaiwadi) जादू दिसत आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी देखील चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. रिलीजनंतरचा पहिला सोमवार कोणत्याही चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण, वीकेंडनंतरच्या पहिल्या दिवशी चित्रपट किती गल्ला जमवतो, यावर त्याची पुढची कामगिरी ठरते. सोमवारी या चित्रपटाने जवळपास 8 कोटींचा व्यवसाय केला आहे.


संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाने शुक्रवारी 10.5 कोटींचा व्यवसाय केला. त्यानुसार बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे भविष्य चांगले दिसत आहे. इतकंच नाही, तर बॉक्स ऑफिसवर 'गंगूबाई'समोर 'वालीमाई' आणि 'भीमला नायक' हे चित्रपटही टक्कर देत आहेत, तरीही चित्रपटाची कमाई जोरदार दिसत आहे. 'गंगूबाई काठियावाडी'ने पहिल्या वीकेंडमध्ये 39.12 कोटींचा व्यवसाय केला होता. तर, सोमवारी या चित्रपटाने 8 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे चित्रपटाची एकूण कमाई 4 दिवसात 47.12 कोटींवर गेली आहे.


 







'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट लेखक हुसैन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्टसोबत अजय देवगण, जिम सरभ आणि शंतनू महेश्वरी यांच्या भूमिका आहेत. शनिवारी या चित्रपटाने 13.32 कोटींची कमाई केली होती. तर, रविवारी चित्रपटाने 15.3 कोटींचा व्यवसाय केला. देशातील बहुतांश सिनेमागृहांमध्ये 50% आसन क्षमतेचा नियम अजूनही लागू आहे. तर, दिल्लीत सोमवारपासून 100% आसनक्षमतेसह रात्री उशिरापर्यंतचे शो सुरू झाले आहेत. याचा फायदा 'गंगुबाई काठियावाडी'ला मिळाला आहे.


संजय लीला भन्साळीच्या चित्रपटाने गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर आणि यूपीमध्ये जोरदार कमाई केली आहे. 'गंगुबाई काठियावाडी'च्या कमाईत काहीशी घट होण्याचे एक कारण म्हणजे मल्टिप्लेक्स मालकांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तिकीट दरही कमी केले आहेत. तर, महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने या चित्रपटाची कमाई आणखी वाढू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha