एक्स्प्लोर

दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, इटलीत शुभमंगल?

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग 10 नोव्हेंबरला इटलीमध्ये लगीनगाठ बांधण्याची शक्यता आहे.

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे बॉलिवूडमधलं हॉट कपल लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर इटलीमध्ये लगीनगाठ बांधण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दीपिका आणि रणवीर या दोघांनी आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलणं टाळलं असलं, तरीही चाहत्यांनी दोघांचं शुभमंगल होणार, ही अटकळ बांधली आहे. 10 नोव्हेंबर 2018 च्या मुहूर्तावर दीपिका-रणवीर लग्न करणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या पावलावर पाऊल टाकत दीपिका आणि रणवीरही इटलीमध्येच विवाहबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दीपिका-रणवीरचं विराट-अनुष्काच्या पावलावर पाऊल
दुसरीकडे, 'मान्यवर' या लग्नाचे पेहराव तयार करणाऱ्या ब्रँडच्या जाहिरातीत विराट आणि अनुष्कापाठोपाठ दीपिका-रणवीर झळकण्याची चिन्हं आहेत. 'मान्यवर'ने आपल्या जाहिरातीसाठी दोघांना संपर्क साधल्याचं म्हटलं जातं. मात्र रणवीर-दीपिका अद्याप आपलं उत्तर कळवलेलं नाही. विराट आणि अनुष्का यांनीही आपल्या नात्याविषयी अशाचप्रकारे अळीमिळी गुपचिळी बाळगली होती. त्यानंतर अचानक 'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकून त्यांनी आयुष्यभरासाठी आणाभाका घेणार असल्याचे संकेत दिले आणि मग डिसेंबरमध्ये थेट दोघं विवाहबंधनात अडकल्याचीच बातमी आली. आता हीच परंपरा रणवीर-दीपिका पाळण्याची चिन्हं आहेत. आतापर्यंत दीपिका-रणवीर यांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा चाहत्यांनी चवीने चघळल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. नोव्हेंबर महिन्यात दोघं बोहल्यावर चढणार असल्याचंही म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी वांद्र्यात दीपिका आईसोबत दागिने खरेदी करताना दिसली होती. त्यामुळे ही लग्नाची खरेदी असल्याच्या चर्चा 'बी टाऊन'मध्ये रंगल्या. 'गोलियों की रासलीला - रामलीला', बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तीन चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तूफान यश कमावलं आहेच, शिवाय त्यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget