Randeep Hooda : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. प्रत्येक भूमिकेसाठी तो मेहनत घेताना दिसून येतो. आता रणदीप हुड्डा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या सिनेमासाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. त्याचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


रणदीप हुड्डाने मे महिन्यात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात तो 'वीर सावरकरां'च्या भूमिकेत दिसून येणार आहे. 'वीर सावरकरां'च्या भूमिकेसाठी त्यानं खास ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. या भूमिकेसाठी त्याने 18 किलो वजन कमी केलं आहे. 


रणदीप हुड्डा एका मुलाखतीत म्हणाला," मी सिनेमासाठी पहिल्यांदाच 18 किलो वजन कमी करत आहे". रणदीप हुड्डाने नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. रणदीपने शेअर केलेला फोटो लिफ्टमधला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे," प्रत्येकालाच कधी ना कधी लिफ्टची गरज भासते". 






'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाचं कथानक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या सिनेमाचं शूटिंग महाराष्ट्रासह लंडन, अंदमान आणि निकोबारमध्ये होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळणार आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा रणदीप हुड्डाचा दुसरा बायोपिक असणार आहे. 


संबंधित बातम्या


Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!


Happy Birthday Randeep Hooda : कधी गाडी धुतली, तर कधी वेटरही झाला! वाचा अभिनेता रणदीप हुडाचा फिल्मी प्रवास..