Sidhu Moose Wala : दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) वडीलांना पुन्हा एकदा लॉरेंस बिश्नोई या गॅंगने ई-मेलद्वारे धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना मेल करत शांत राहण्याची धमकी दिली आहे. नाहीतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना मिळेल्या धमकीवर मानसातील एस एस पी गोरव यांनी एबीपी न्यूजसोबत संवाद साधण्यास नकार दिला. पण ते म्हणाले,"सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे". सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आता त्याच्या कुटुंबियांना धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. 


सिद्धूचे आई-वडील सध्या विदेशात आहे. यापूर्वी रविवारी सिद्धूचे वडील म्हणजे बलकौर सिंह म्हणाले होते, कोणाच्या धमकीमुळे घाबरण्यातला मी नाही. माझा मुलगादेखील कधी कोणाला घाबरला नाही. त्यामुळे शेवटी त्याची हत्या करण्यात आली. 


मानसा जिल्ह्यात शुभदीप सिंह सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. 


पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती. सिद्धू मुसेवाला सहा महिन्यांनी लग्न करणार होते. मुसेवाला यांची अंतिम यात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी या ट्रॅक्टरवर शूट केली होती.


संबंधित बातम्या


Sidhu Moose Wala Murder Case : सिद्धू मुसेवाला यांना सर्वात जवळून गोळी घालणारा शूटर अंकित सिरसाला अटक


Salman Khan Security : बंदुकीचा परवाना अन् बुलेटप्रूफ गाडी; जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानला कडेकोट सुरक्षा