Ramayana Set Video Viral : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'रामायण' (Ramayana) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगला या आठवड्यात सुरुवात झाली आहे. सध्या या चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'दंगल' फेम नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. भव्यदिव्य स्वरुपात 'रामायण' चित्रपटाचं शूटिंग होत आहे. त्यामुळे या सिनेमाचा सेटदेखील बिग बजेट आणि भव्यदिव्य आहे.


'रामायण' चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण' चित्रपटाचा सेट बनवायला 11 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटात अयोध्या (Ayodhya) दाखवण्यासाठी खूप मेहनत घेण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये अयोध्याचा सेट दिसत आहे. 'रामायण'चा सेट खूपच विशाल आहे. पिलरवर पारंपारिक कलाकृतींची झलक दिसून येत आहे. तसेच व्हिडीओमध्ये क्रू मेंमर्ब आणि कॅमेरावगैरे गोष्टी दिसून येत आहेत. 


तीन भागांत प्रदर्शित होणार 'रामायण' 


'रामायण' या चित्रपटाचे तीन भाग असणार आहेत. राम जन्मस्थळावर आधारित पहिला भाग असणार आहे. त्यामुळे रणबीरचा हा दुसरा ट्रायलॉजी चित्रपट असू शकतो. नितेश तिवारी 'रामायण' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. नितेश तिवारी यांनी याआधी 'दंगल' आणि 'छलांग' सारख्या सुपरहिट चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रणबीर कपूर 'अॅनिमल' (Animal) या चित्रपटात शेवटचा दिसला होता. या सिनेमात तो मुख्य भूमिकेत असला तरी नकारात्मक होता. आता या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका साकारण्यासाठी रणबीर सज्ज आहे.


'रामायण' या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. 3 एप्रिल 2024 पासून 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये गुरुकुलचा सेट तयार करण्यात आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलमध्ये राम, लक्ष्मण आणि भरत यांची बालपणीची भूमिका साकारणारे बालकलाकार शूटिंग करणार आहेत. अभिनेता रणबीर कपूर लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.


कोण कोणत्या भूमिकेत दिसणार? 


रणबीर कपूर : प्रभू राम
साई पल्लवी : सीता
यश - रावण
सनी देओल - हनुमान
लारा दत्ता -कैकेयी
रवी दुबे - लक्ष्मण
रकुल प्रीत सिंह - शूर्पणखा
साक्षी तंवर - मंदोदरी
इंदिरा कृष्णा - कौशल्या


'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूरने 75 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तीन भागांसाठी त्याला 225 कोटी रुपयांचं मानधन मिळणार आहे. तर सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने 6-8 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तर यश आता रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रावणाने या भूमिकेसाठी 50 कोटी रुपये चार्ज केले आहेत. 


संबंधित बातम्या


Ramayana : रणबीरसह सर्वांना 'नो फोन पॉलिसी',सीन नसल्यास सेटवर येण्यास कलाकारांना सक्त मनाई;नितेश तिवारींनी रामायणाच्या टीमसाठी का लागू केले इतके कठोर नियम?