Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) 8 एप्रिल 2024 रोजी आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. "पुष्पा राज... मैं झुकेगा नहीं साला" म्हणत अल्लू अर्जुन जगभरात चांगलाच लोकप्रिय झाला. आता अभिनेत्याच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे त्यामुळे अभिनेत्याच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट मिळणार आहे. अल्लू अर्जुनवर सध्या सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच आगामी चित्रपटासाठी उत्सुक असल्याचंही सांगत आहेत.


अल्लू अर्जुनचा जन्म 8 एप्रिल 1982 रोजी चेन्नईतील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. अल्लू अर्जुनचं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीसोबत जोडलं गेलेलं आहे. अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगैया एक होमियोपॅथिक डॉक्टर आणि स्वातंत्र्यसेनानी होते. अल्लू रामलिंगैया यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे. तर अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद हे तेलुगू सिनेमांचे निर्माते होते. 'गीता आर्ट्स' नामक त्यांची निर्मिती संस्था होती. 


वयाच्या तिसऱ्या वर्षी रुपेरी पडद्यावर झळकला अल्लू अर्जुन!


अल्लू अर्जुनला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी अल्लू अर्जुन पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला. 1985 मध्ये रिलीज झालेल्या 'विजेता' चित्रपटात अल्लू अर्जुनने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. तर 2003 मध्ये आलेल्या 'गंगोत्री' चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत झळकला. 


अल्लू अर्जुनची पहिली कमाई किती? (Allu Arjun Networth)


अल्लू अर्जुनची पहिली कमाई 3500 रुपये होती. अल्लू अर्जुनची आज एकूण संपत्ती 360 कोटींच्या आसपास आहे. तसेच त्याच्याकडे एक व्हॅनिटी व्हॅनदेखील आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 7 कोटींच्या आसपास आहे. त्याच्या आलिशान घराची किंमत 100 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी अल्लू अर्जुन 10 कोटी रुपये मानधन घेतो. दर महिन्याला तो 3 कोटी रुपये कमावतो. अल्लू अर्जुनकडे अनेक महागड्या, आलिशान गाड्या आहेत.


अल्लू अर्जुनचा 'आर्या' हा चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. अभिनयासह अल्लू अर्जुनला संगीत आणि नृत्याचीदेखील आवड आहे. अल्लू अर्जुनला साऊथचा मायकल जॅक्सन म्हटलं जातं. फिल्मी बॅकग्राऊंड असतानाही अल्लू अर्जुनने अॅनिमेशन शिकला. 


अल्लू अर्जुनचे गाजलेले चित्रपट कोणते? (Allu Arjun Top 10 Movies)


- हॅप्पी
- देसामुदुरू
- पारुगु
- वेदम
- जुले
- रेस गुर्रम
- S/0 सत्यमूर्ती
- सररैनोदु
- DJ: दुव्वाडा जगन्नाधाम
- ना पेरु सूर्या, ना इल्लू इंडिया
- अला वैकुंठपुरामुल्लू
- पुष्पा: द राइज


अल्लू अर्जुनची फिल्मी लव्हस्टोरी (Allu Arjun Sneha Reddy Love Story)


अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहासोबत लग्न केलं होतं. एका कॉमन मित्राच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती. पहिल्या भेटीतच तो स्नेहाच्या प्रेमात पडला होता. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अल्लू अर्जुनच्या घरी त्यांचं नातं मान्य होतं पण स्नेहाच्या घरी मात्र मान्य नव्हतं. पुढे अल्लू अर्जुनने स्नेहाच्या घरच्यांना मनवलं आणि 2011 मध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत ते लग्नबंधनात अडकले. 


संबंधित बातम्या


Allu Arjun : झुकेगा नहीं साला! 'पुष्पा 2'च्या रिलीजआधीच अल्लू अर्जुनने केली 'Pushpa 3'ची घोषणा